शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

स्वराज्य ध्वज
दिमाखात फडफडला
जयघोष करतो
हर ऐक मावळा
सह्याद्रीच्या
कडेकपारी
दुममला चौघडा….
स्वराज्याचा
अलौकिक
शिवराज्याभिषेक सोहळा….

उधळण रंग,
फुलांची सांडून…
पायघड्यांनी
पथ अंथरला….

दीपोत्सवाने
प्रकाश गुंफून
शिवरायांच्या
पदस्पर्शाने पावन
हा रायगड हा आज सजला…
स्वराज्याचा अलौकिक शिवराज्याभिषेक सोहळा…

माय जिजाऊ
कृतार्थ होऊन
मायभूमी ची
किर्ती गाऊन
सुर्वणक्षण हा घडला…
स्वराज्याचा अलौकिक शिवराज्याभिषेक सोहळा…

शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा


कवियत्री-
सौ. गीतांजली कोळी. धुळे
6/6/2021