शिवपट्टन खर्डा किल्ला

शिवपट्टन खर्डा किल्ला
शिवपट्टन खर्डा किल्ला

शिवपट्टन खर्डा किल्ला

चला जाऊया गडकिल्ल्यांवर
(शिवपट्टन खर्डा किल्ला ता जामखेड नगर)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*****************************
नानाभाऊ माळी

 महाराष्ट्र शौर्याची, त्यागाची,संतांची भूमी आहे!उंच उंच सह्याद्री शिखरं!दूरवरून वहात येणाऱ्या नद्या!प्रचंड जंगलं!अशा या पवित्र भूमीत जसे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज!गुरु शिष्य परंपरा असलेल्या या महान भूमीच्या रक्षणासाठी महापराक्रमी राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या भूमीसाठी वाहिले आहे!…. गर्वाने नतमस्तक व्हावे अशा महान शिवरूपी महाराजांसाठी महाराष्ट्र भूमीतील तमाम राष्ट्रप्रेमी कोटी कोटी प्रणाम करीत असतात!अशा महापराक्रमी राजानंतरही या भूमितील शूर मराठ्यांनी आपली शान, बान पणाला लावून अनेक आव्हाने अंगावर घेत महाराष्ट्र सुरक्षित ठेवला!त्यातील ऐतिहासिक खडर्याचीं लढाई देखील तमाम महाराष्ट्र समाजासाठी गौरव, अभिमान वाटावी अशी आहे… त्या विषयी! 🚩

शिवपट्टन खर्डा किल्ला
शिवपट्टन खर्डा किल्ला

गडकिल्ले आमचे स्फूर्तीस्थानं आहेत!ऊर्जास्रोत आहेत!अस्मानी सुलतानी संकटावर मात करण्यास शक्ती देत असतात!किल्ले ताकद, हिम्मत, शक्तीकेंद्र होती!किल्ला चढातून साहसाची परीक्षा घेतली जाते!अटीतटी,बाका प्रसंगी निर्णयक्षम होण्यासाठी साहसी इतिहास डोकावून पाहिला पाहिजे!आम्ही अशाच एका भुईकोट किल्ल्यावर गेलो होतो!नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा या गावी असलेल्या भुईकोट खर्डा किल्ल्यावर गेलो होतो!त्याला शिवपट्टण किल्ला देखील म्हणतात!🚩

शिवपट्टन खर्डा किल्ला
शिवपट्टन खर्डा किल्ला

खर्डा किल्ला जिंकण्यासाठी सर्व मराठे एक दिलाने लढले होते!एकीचं बळ दाखवतं निजामाला पळतीभुई भारी केली होती!सडकून मार बसल्यावर खर्डा किल्ला जिंकून घेतला होता!अशा ऐतिहासिक *खर्डा* किल्ल्यावर आम्ही रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी गेलो होतो!पुण्याहून आम्ही साहसी मावळे आमचे कॅप्टन आदरणीय श्री. वसंतराव बागूल सरांच्या सोबत बसने गेलो होतो!पुण्याहून साधारण २०० किलोमीटर दूर असलेल्या खर्डा किल्ल्याकडे पुण्याहून निघालो होतो!चंदननगर, वाघोली, केसनंद, राहू, काष्टी, श्रीगोंदा, जामखेड मार्गे जात खडर्याला पोहचलो होतो!🚩

 खर्डा किल्ला अहिल्यादेवी नगर(पूर्वीचा अ. नगर जिल्हा)पासून साधारण १०० किलोमीटर दूरवर जामखेड तालुक्यात आहे!बालाघाट डोंगर रांगेतील एका सफाट भुभागावर दगड चुण्यात आखीव रेखीव कलाशिल्पातं बांधलेला खर्डा किल्ला आहे!बांधकाम खूप जुनं असावं!राजे निंबाळकरांनी हा किल्ला बांधला असावा!साधारण २५० वर्षांपूर्वी बांधलेला भुईकोट किल्ला भक्कम स्थितीत असून जुन्या दगडी पायऱ्या,बुरुज, तटबंधी अतिशय मजबूत स्थितीत आहेत!बुरुजावर एक तोफमॉडेल,प्रतिकृती ठेवली असून मुख्य प्रवेश द्वारावर सांगमरवरी शिलालेख दिसतो!

कदाचित तो शिलालेख फारशी भाषेत असावा!बुरुजावर स्वराज्य रक्षक भगवाध्वज फडकतांना दिसतो!दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या अन डाव्या बाजूस सैनिकांसाठी देवळ्या बांधलेल्या दिसतात!तेथेच एका दगडी इमारतीत अनंत तोफगोळे ठेवलेले दिसलें!जेव्हा लढाई झाली होती तेव्हा मराठ्यांनी किल्ल्याबाहेरून तोफगोळ्यांचा प्रचंड मारा केला होता!हेच ते तोफगोळे असावेत!किल्ल्याच्याआत समोरून एक वास्तू बांधलेली दिसते!काही उंच चौथरे दिसतात!आतील बरचसं बांधकाम डागडुजी करून घेतलं आहे!🚩

Kharda Fort
Kharda Fort

तटबंदीवर चढायला आठ ते नऊ ठिकाणी उभट दगड-चुण्यात बांधलेल्या पायऱ्या आहेत!चार बुरुजावर विशिष्ट बांधकाम केलेले आहे!तटबंदीआतून गरम तेल सोडण्यासाठी जमिनीच्या दिशेने उभट छिद्र दिसतात,तोफ गोळे,अन बंधूकीतून शत्रूस टिपण्यासाठी तटबंदीवर सुरक्षित जागा बांधलेली दिसते!तटबंदीची उंची साधारण साठ फुटांपेक्षाही जास्त असावी!रुंदी अंदाजे दहा फूटांची असावी!तटबंदीवरून पूर्ण किल्ला फिरून येऊ शकतो!पुरातत्व विभागानें किल्ल्यावर डागडुजी केलेली दिसते!आत एक विहीर देखील आहे!तिला बारमाही पाणी असावे!आतल्या बाजूस अनेक चोर वाटा असाव्यात ज्या बुजवलेल्या दिसतात!तटबंदी बाहेर खंदक देखील नजरेस पडतं!

 खडर्याची ऐतिहासिक लढाई इतिहासातील शौर्यगाथा समजली जाते!शिवपट्टण(खर्डा)येथे मार्च १७९५ साली हैद्राबादच्या निजामा विरुद्ध मराठे लढले होते!मराठ्यांचे दिवाण,(वकील) गोविंद काळे यांच्या समोरचं निजामाच्या दिवानांनें मराठ्यांविषयी उपहासत्मक व्यंग केले होते व थकीत चौथाई देण्यासंही नकार दिला होता!हा वृत्तांत नाना फडणवीसांना कळल्यावर विशाल सेनेची जुळवाजूळव करीत सर्व मराठ्यांचीं सैन्य घोडनदी पार करीत जामखेडकडून खर्डाकडे कूच करीत निघाली होती!मध्येच निजामच्या सैन्यासोबत लहानमोठया चकमकी घडतं राहिल्या!त्यात एका घटनेत मराठा सेनेचे सरदार विठ्ठलपंत गोळी लागून विरश्री झाले!हे दुःखद वृत्तांत ऐकून मराठ्यांनी मैदानावरील समोरासमोर लढाईतं निजामाला घेरून त्याचे १५०० सैनिक मारले होते!🚩

निजामानें मराठा सैन्यासमोर नांगी टाकली होती!निजामकडे थकलेली चौथाई येणे बाकी होती!त्याचा दिवाण मुशीर मुल्क याने ती मागणी फेटाळून लावली होती!वऱ्हाडातील भोसलेंचा महसूल अधिकारही नाकारला होता! पुण्यातून नारायणराव पेशव्यांचे पुत्र सवाई माधवरावांच्या वतीने नाना फडणवीस राज्यकारभार पाहात होते!दक्षिणेतील आपली शक्ती वाढवावी अन थकीत चौथाईची मागणी करून शिंदे, राजपूत, होळकर, अन भोसल्यांच्या एकत्रित महाफौजेने निजामावर चाल करून घेरले होते!

घाबरलेला निजाम ब्रिटिशांसमोर झोळी घेऊन गेला होता पण ब्रिटिशांनी हात दिला नव्हता! समोसमोरं झालेल्या लढाईत,युद्धात निजाम टिकू शकला नव्हता!तो शिवपट्टन किल्ल्यात आश्रयाला गेला!पण मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला!अन्न पाणी रोखून धरले!किल्ल्यासभोंवती तोफा आणून ठेवल्या!निजाम घाबरून, भीतीने, भयाने इ स १७९५ मार्च महिन्यात तहाला राजी झाला होता!ही लढाई मराठा साम्राज्यासाठी विजयी लढाई ठरली होती!तहानुसार मागील चौथाई अन युद्ध खंडणीपोटी पाच कोटी रुपये देण्यास निजामाने मान्य केलं होतं!सोबत दौलताबादचा किल्ला अन एक चौथाई भुभाग पेशव्याना देण्यास भाग पाडले होते!🚩

तहानुसार सर्व मान्य करूनही निजाम खर्डत रखडत चाल ढकल करीत राहिल्याने मराठे पून्हा चाल करून येऊ लागताच निजामाने मान्य केलेल्या तहानुसार सर्व अटींचं पालन केले होते!अर्थात किल्ल्याचे खर्डा नाव पडण्यामागे निजामाने टाळत रखडत खर्डतं दिवस काढले म्हणून खर्डा नाव प्रचलित झाले होते!खर्डा गावात असणारा हा भुईकोट किल्ला अजूनही भक्कम स्थितीत आहे!१७९५ साली जिंकलेली ऐतिहासिक लढाई नंतर झालीचं नाही!पूढे पेशवे सवाई माधवरावांच्या अपघाती निधनानंतर ब्रिटिशांनी एक एक सत्ता गिळंकृत करीत इ स १८१८मध्ये  सत्ताधीश झाले होते!

 किल्ला भुईकोट असला तरीही दोन अडीचशे वर्षांपासून जसाचा तसा शाबूत आहे!काळा पाषाण चुण्यात बांधलेला भुईकोट किल्ला बुरुज अन तटबंधीसह अजूनही उत्तम स्थितीत आहे!२००किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून खर्डा भुईकोट किल्ला पाहता आला मराठाशौर्य इतिहासाचं एक पान उलगडून,चाळून हृदयात स्मरणासाठी ठेवता आलं हे महाभाग्य समजतो!विरांची विरश्री हृदयी ठेवण्यासारखं महापून्य ते कुठले असावे!🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*****************************
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ जुलै २०२५

शिवपट्टन खर्डा किल्ला
शिवपट्टन खर्डा किल्ला