रक्षाबंधन कविता
नातं भावंडांचं
“नातं भावंडांचं भाऊबीज कविता“
———————–
घट्ट होतं तेच नातं
मुक्ताई अनं ज्ञानाचं
निर्मळाहुनी जे होतं
निर्मळ ते सज्ञानांचं //१//
नातं तेच दोहोंचंही
होतं भावंडांचं धन्य
नव्हतं ते कुणाचंही
दुर्मिळ तसे जे अन्य //२//
जपले ज्या बंधनांना
सर्वच ह्या भावंडांनी
निरामय बांधतांना
निरागस भावनांनी //३//
हळुवारपणे ज्यांनी
जपले याच नात्याला
मुक्ताई नि ज्ञानोबांनी
मायलेकींसम त्याला //४//
असेंच ज्यांनी व्यापले
याच नात्यास दोहोंनी
माया,ममत्व जपले
एकत्र बंधुभावांनी //५//
असेंच वागावे कुणी
दारोदार प्रत्येकांनी
सर्वांनी प्रीतीत ऋणी
व्हावे भावा बहिणींनी //६//
स्वतः ही अनुभवावे
कुणी त्यांच्या या प्रेमास
निःस्वार्थीही निभवावे
त्यांच्या निर्मळ मनास //७//
जसेंही आपापल्यांच
स्वतःच्याच ज्या ओठांना
केव्हाही आपापल्यांच
दातांनी चावा घेतांना //८//
असे जरी घडल्यास
संबंधही सुधारणे
गरजच पडल्यास
जीभेनेही ते करणे //९//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.-9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
//रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा//
——————————————
(“मानस नातं भावंडांचं”)
—————————
याच जगी धन्य झालं
मानलेलं मानसंच
बहीण नि भावा वालं
नातं एकही प्रेमाचं //१//
तेच होतं एक नातं
द्रौपदी नि कृष्णाचं
प्रेमाहुनी तसं नातं
होतं प्रेमळ असंचं //२//
जपायला हवं याच
अशा प्रेम बंधनास
नाजूक भावनेच्याच
प्रेमळ त्या संबंधास //३//
जसें जपले दोहोंनी
हळुवारपणानेच
मानसं ज्या भावंडांनी
द्रौपदी नि कृष्णानेच //४//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.-9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

साधा नसेच धागा
साधा नसेच धागा
साधा नसेच धागा अनमोल मोल आहे
भाऊ बहीण यांची माया सखोल आहे
वर वर जरी दिसाया भाऊ कठोर श्रीफळ
हृदयात गोड शीतल दडवून ओल आहे
समवेत खेळतांना होतात भांडणेही
निःस्वार्थ प्रेम त्यांचे तोलास तोल आहे
बिलगून बहीण रडली माहेर सोडताना
देऊन धीर वदला स्मरणात बोल आहे
ओवाळणीत बंधू देवो न एक दमडी
रक्षाच श्रेष्ठ बाकी ऐश्वर्य फोल आहे
बंधन जगा निराळे रक्षेस धर्म मानी
इतिहास साक्ष द्याया बडवीत ढोल आहे
रक्तातले ‘किरण’ जे डागाळतात नाते
ऐशा नराधमांचे चारित्र्य झोल आहे
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

*—🌸—चारोळ्या रक्षा बंधनाच्या—🌸—*
१}एक राखीचे बंधन
श्रेष्ठ अन्य धनाहून
भाऊ बहिणीचे प्रेम
हेच ठेवते बांधून ॥
२}काय सांगतो राखीचा
पहा बांधवांनो धागा
भगिनींशी बांधवांनो
प्रेम भावनेने वागा ॥
३}इथे तिथे जिथे तिथे
भगिनींचे आक्रंदन
धावा ऐकता धावा रे
म्हणे राखीचे बंधन ॥
४}काय देऊ भूमातेच्या
माझ्या स्वातंत्र्याची ग्वाही
कसा देश हा स्वतंत्र
जिथे स्त्री स्वतंत्र नाही ॥
*–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
*—🌸—* *—🌸—*
