रंगमंचावर चे नाटक जमीनीवर आले पाहिजे

रंगमंचावर चे नाटक
रंगमंचावर चे नाटक

रंगमंचावर चे नाटक जमीनीवर आले पाहिजे

रंगमंचावर चे नाटक जमीनीवर आले पाहिजे

नाटक ही अभिव्यक्ती साहित्यात मोडत असली तरीही ती साहित्य पेक्षा वेगळी आहेच.ती साहित्य सारखी वर्णनात्मक नसते.तर ती प्रसंगात्मक असते.त्यातून त्या घटनेचे,प्रसंगाचे दहा दिशेने अवधान असतेजे जे जमीनीवर घडते ते  रंगमंचावर प्रदर्शित केले जाते.वर्तमानातील काही घटना,काही प्रसंग,काही संवेदना सरळ सरळ सांगता येत नाहीत.भीती वाटते.म्हणून नाटक स्वरूपात मांडाव्या लागतात.नाटक ही हौस नसते.ती मजबूरी असते.सत्य तर सांगायचे आहे पण जोखीमीचे असते.

आत्मघातकी ठरते.म्हणून कलात्मक रीतीने सांगावे येते.संवेदना दडपून ठेवता येत नाही आणि उघड उघड सांगताही येत नाही तेंव्हा नाटक ही कला कामाला येते‌.आई ऐकून घेत नाही तेंव्हा बाळ रडतो.अंकात करतो.बाळाचे रडणे आईलाच कळते.म्हणून म्हणते,थांबा मला कळले त्याला काय म्हणायचे ते!त्याला भूक लागली आहे!तसेच नाटकातील कलाकारांचे बोलणे, म्हणणे आवभाव करणे संवेदनशील प्रेक्षकालाच समजते.इतरांना ती करमणूक वाटते.नाटक ही करमणूक नाही.ती संवादाची जिवंत अभिव्यक्ती असते.असंवेदशील प्रेक्षकाला संवेदना व्हावी या हेतूने त्यात कला असते.अभिनय असतो.संवाद असतो.चढाव उतार असतो.स्टॉप, नॉनस्टॉप असतो.

नाटकातील वाद,संवाद जर कोणाला भेदत असतील,छेदत असतील तर राग येऊ शकतो.रागातून दुर्घटना होऊ शकते.ती नाटकातील सहजतेने,लिलयेने, नम्रतेने कमी करता येते,टाळता येते.कालीदास, शेक्सपिअर यांची नाटके त्या त्या काळातील सत्य सांगणारी होती.पण प्रेक्षकांनी त्यात फक्त कला पाहिली.म्हणूनच नाटक हे रंगमंचावरच राहिले,चालले,टिकले.जमीनीवर कधी आलेच नाही.जमीनीवर येणे हाच त्यामागील उद्देश आहे.   

नाटकातून काही चुकीच्या व्यक्तींचे उदात्तीकरण केले जाते.त्याचा फायदा त्या चुकीच्या व्यक्ती घेतात.नाटकाला आर्थिक आश्रय देऊन आपण तसे नाहीत असा समज निर्माण करतात.आधी रामाचे देवपण सांगणारी रामलिला होत असत. आता रावणाचे उदात्तीकरण करण्यासाठी रामलिला होऊ लागलेल्या आहेत.उत्तर भारतात रावणाचे पात्र करण्यासाठी चढाओढ लागते.कधी कधी तर रावणाचा रोल मिळावा म्हणून नाटकाचे प्रायोजकत्व स्विकारले जाते.हेतू ,खलनायकाला नायक म्हणून मिरवता येते.मला वाटते ,याच कारणे आजच्या राजकारणात गुंडांनी जागा बळकावलेली आहे.उत्तर भारतात आधी आणि आता महाराष्ट्रात सुद्धा!हे गमक  नाटक कलावंतांना, सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्यांना अजून तरी कळलेले नाही.

राम रावण निरपेक्ष रामायण लिहीलेले असल्याने त्याचे आकर्षण कमी होत नाही.आता साहित्य वाचले जात नाही.पुस्तके विक्री होत नाही.खंत तर वाटते.पण कारणे शोधली जात नाहीत.ती शोधली पाहिजे.मला माझ्या शोधक नजरेने जे दिसते ते मी मांडतो.माझ्या लेखात वाचकांना ,प्रेक्षकांना गोंजारणे नसते.जमीनीवरचे दुखणे जमीनीवरच मांडणे मला आवडते.नाटक हे सत्यापासून दूर जाऊ नये.सत्याचा धागा घेऊन कलेची फुले गुंफली पाहिजे.हिच माझी अपेक्षा.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

रंगमंचावर चे नाटक
रंगमंचावर चे नाटक