युवादिन

युवादिन

युवादिन

(“आजची तरुणाई”)
~~~~~~~~~~
आज बरेच युवक
मौजेत आहेत मग्न
हातात नाही आवक
तरी करतात लग्न ।।१।।
खोटा आदर्श घेऊन
ठेवतात दाढी मिशा
निकृष्ट अन्न खाऊन
करतात फक्त नशा ।।२।।
पण जे युवक धन्य
झाले सत्कार्य करून
ज्ञानी बनले ते अन्य
ज्ञानोबा सम तरुण ।।३।।
स्वामींसम काही युवा
त्यांनीही केले सत्कर्म
होऊन गेले ते शिवा
स्थापून स्वराज्य धर्म ।।४।।
आजकालचे युवक
त्यांनी व्हावे देशप्रेमी
अनं होऊन लायक
जपावी भारत भूमी ।।५।।

(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~