माणुसकी

मराठी कविता संग्रह

माणुसकी

नका कधी सोडू । माणुसकी ।।


दुर्जनास फक्त । दुर्जन आवडे ।
सज्जन नावडे । काही केल्या ।।

तयांना कधीच । पचेना सद्गुण ।
नित्य अवगुण । त्यांच्या मनी ।।

सत्याचा विरोध । असत्य स्वीकार ।
धर्माला नकार । प्रिय त्यांना ।।

दुर्जनांना मृत्यू । छळेल नेहमी ।
जगण्याची हमी । त्यांची नाही ।।

मनी सदा घाण । अपशब्द मुखी ।
जगी नाही सुखी । ऐसे जन ।।

संगत तयांची । फार विघातक ।
वेदनादायक । त्यांची वाणी ।।

दुर्जन ओळखा । त्यांना दूर करा ।
सत्य मार्ग धरा । बांधवांनो ।।

सर्वत्र असत्य । पाप,अत्याचार ।
वाढेल अंधार । नाहीतर ।।

सज्जन माणसे । अजू म्हणे जोडू ।
नका कधी सोडू । माणुसकी ।।

शब्दसखा:- अजय रमेश चव्हाण
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *