महात्मा ज्योतिबा फुले
विषय:-ज्ञानाचा देवता
महात्मा ज्योतिबा फुले
या भूमीवर जन्मले क्रांतिसूर्य
थोर समाजसुधारक विचारवंत
श्री.महात्मा ज्योतिबा फुले
अज्ञाना केले त्यांनी ज्ञानवंत..!
अस्पृश्यता ही मिटविण्यासाठी
समाजातील प्रत्येक मनुष्याला
प्रेरीत करून जागृत करण्याचे
काम लावले अहोरात्र समाजाला..!
स्री शिक्षणासाठी त्यांनी उभे केले
आपल्या स्वताच्या धर्म पत्नीला
सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या मुळेच
स्री शिक्षणाचा पाया मजबूत झाला..!
इ.स.१८६९साली महात्मा फुले
यांनी रायगडावरील शिवरायांची
समाधी शोधून काढली तेव्हा त्यांनी
त्यांच्या जीवनावर प्रदिर्घ पोवाडा लिहिला..!
शिवाजी महारांजाचे कार्य लोकांपर्यंत
पोहचावे आणि एकजुटता दिसली
इ.स.१८७०पासून मोठ्या प्रमाणात
शिवजयंती साजरी होवू लागली …!
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३
Pingback: dr br ambedkar डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती - मराठी 1