रान भिजल पाण्यानं मराठी पाऊसाच्या कवीता
शीर्षक- रान भिजल पाण्यानं
रान भिजल पाण्यानं
चाले तिफणीचा फेरा
हर्ष दाटला मनात
झाला शिवाराचा पेरा
कोंब दिसे काकरात
जणू रांगोळी रेघांची
राणी पडली सावली
पाणी भरल्या मेघांची
काळाकुट्ट मेघराजा
टेके डोंगराच्या माथी
त्यात दिसती पेटत्या
लख्ख विजेच्याच वाती
झाडं डोलती रानात
तृष्णा मिटली सा-याची
टाके शिवारात जीव
गार झुळूक वा-याची
काळा डोंगर नेसला
शालू हिरव्या रंगाचा
नाच करतो नदीत
पुर वेगळ्या ढंगाचा
पाट पाण्याचा वाहती
निघे फेसाळून कडा
करे ऐटीत गायन
वनी लहानसा ओढा
बळी हसतो गालात
करे गणित वर्षाचे
कृपा झाल्या पावसाची
दिस येतील हर्षाचे
संतोष कपाले
रायगांव ता.लोणार सरोवर