मराठी कवीता प्रश्न चिन्ह
कधी कधी वाटतं मला
आयुष्य म्हणजे प्रश्न आहे
उत्तर असतो आपणच
समजणे फक्त कठीण आहे ….!!
खुप होतात चुका
कळत नकळत आपल्या
भावनांच्या भरात काढतो
आपण त्यावरील खपल्या …..!!
समजुन घेणे म्हणजे
खरा कलेचा आविष्कार आहे
गैरसमज तर फक्त
पुढे पाठ मागे सपाट आहे ….!!
हवं नको ते तर आपण
आपापल्या परीने मिळवितो
देणा-याचे हात मात्र
आपण दोन्ही हाताने मोडीतो …!!
आयुष्य म्हणजे काय
खरच सांगा कोणाला कळलं
जगायाचं म्हणून जगणं झालं
बाकी काय शून्यच उरलं ….!!
एक प्रश्न चिन्ह शेवटाला
माझ्या मरणाला लागणार आहे
का जगलो मी स्वतः साठी
मेल्यानंतर ही छळणार आहे …!!
सुभाष उमरकर सामनगांव नाशिक
९०२२६२२८५६