प्रणय कविता मराठी पाचूतला मोतीहार
🌿🌼 🌼🌿
तुझी उणीव शेवंती
मोगर्याने पुरी केली
म्हणे विसर उदासी
शेवंतीची आली गेली॥धृ॥
पहा मोगरा हसला
कसा खुदकन गाली
खिन्न मनाची पाकळी
अहा फुलून ही आली॥१॥
शेवंतीच्या सवे झेंडा
झेंडूनेही हलविला
कशी विसरु मी त्याने
बगिचा हा फुलविला॥२॥
स्मृतिपटलावरी ह्या
खुणा अजूनी राहिल्या
कवितेत माझ्या मीही
सार्या होत्या त्या गायिल्या॥३॥
होता बागेश्रीने हिचा
तेॅव्हा गजरा माळला
तिच्यावाचून बागेची
झाली पहा अवकळा॥४॥
हिर्व्या पाचूत मौतिक
याचा हार बहरला
पानापानात कळ्यांचा
गुुच्छ असा मोहरला॥५॥
—निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ , नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿

