पुस्तक
(“पुस्तक”)
—————
कुणीही छापूच नये
वाचण्यासाठी पुस्तक
कुणी फक्त वाचू नये
छापलेले ते पुस्तक //१//
छापलेले मीही नाही
पुस्तक खपण्यासाठी
खपलेलो मीही नाही
पुस्तक छापण्यासाठी //२//
शब्द होते वाचलेले
कुणी जपावे म्हणून
शब्द होते जपलेले
कुणी वाचावे म्हणून //३//
पुस्तकातील ते शब्द
सर्व होते थकलेले
एका जागेवर स्तब्ध
सर्वांपुढे झुकलेले //४//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~