पंढरपूर वारी
हरी पालख्या भिजवून गेल्या
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
****************************
… नानाभाऊ माळी
दर वर्षांप्रमाणे या वर्षीही आम्ही गेलो होतो!पहाटे थोडं लवकर उठावं लागलं होतं एवढंच!आपण ठरवल तर मानजोगतं जमवून येतं असतं!काळ,वेळ तिथी सुद्धा आपल्याला साथ संगत देत असतात!आपण मनातलीं प्रतिमा प्रत्यक्ष पाहण्यासाठी,मिळविण्यासाठी धडपडतं असतो!योगायोग जुळून येतो!ठरवलेलं उपलब्ध होत असत!आम्ही कित्येक वर्षें हक्काची वेळ काढून जातं आहोत!पाहात आहोत!अंतरंगी आनंदून जातो!मनसोक्त त्यात डुंबून जातो!सर्व काही विसरून त्यात एकरूप होऊन जातो!होय,त्या दिवशी २२ जून २०२५ च्या एकादशीला हडपसर येते भागवत धर्माची पताका हाती घेऊन निघालेला टाळमृदूंगी सागर डोळ्यात भरून घेत होतो!उंच काठीवंर फडकणाऱ्या भागवती पताका डोळ्यात विठू दर्शन दाखवीत होत्या!दुर दूरवर नजर जावी तेथवर विष्णुदासांचीं मांदियाळी दिसत होती!टाळ मृदूंगाच्या ताल सुरात,भक्ती नामात तल्लीन झालेले वारकरी भजनात एकचित्त होऊन श्रीविठ्ठल दर्शनासाठी दिंडीतून निघाले होते!पंढरपूरनिवासी भक्तीआराध्य कानडा विठ्ठलू कमरेवर हात ठेवून उभा आहें!कित्येक युगे उभा युगाराध्याचं दर्शन घेण्या भोळा भाबळा मुखी विठ्ठल नाम घेत निघाला होता!खांद्यावर, कमरेवर, हाती अनंत भक्त, संतांना स्थान देणारा विष्णूरूपे श्रीविठ्ठल मायाळू, कनवाळू माय माऊली होऊन ममतेने उभा होता!..🚩
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली महाराज,जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराजांच्या पालख्यांसहित अनेक संतांच्या पालख्या हडपसरला एकत्र आल्या होत्या!अफाट, विशाल त्या भक्तीसागरीं कर्णमधुर तृप्ती,भक्ती गोडवा गात होते!नादब्रम्ह रंगूनी, भजनातं दंगून गेलें होते!पालखी सोहळ्याच्या दिंडीतील वारकरी आपापल्या दिंड्यातून विठूनामाचा गजर करीत होते!एक एक पाऊल पंढरपूर दिशेने पडत होते!अनंत पालख्यातून अनंत दिंड्या निघाल्या होत्या!श्रीतुकोबाराय देहूहून, श्रीज्ञानोबामाऊली आळंदीहून पालखीत निघाले होते!विराट, विशाल भक्तीसोहळा किर्तन,भजनातून श्रीविठ्ठल नामात रमले होते!येता येता पुण्यात दोन दिवस मुक्कामी थांबून,पुणेकरांना भक्तीप्रसाद वारीला निघाले होते!पालख्या, दिंड्या हडपसरपर्यंत एकाचं मार्गावरून येत होत्या!कित्येक किलोमीटर लांबवर नजर जावी तिथंवर भक्तीनाद घुमत होता!सहा-सात लाखांचा वैष्णवसागर भगव्या लाटांतं घुसळून विशालता दर्शवीत होता!प्रत्येक भक्ताच्या हृदयी श्रीविठ्ठल विसावला होता!अनोखा, देखणा पालखी सोहळा रूपा अरूपात ‘माऊली’ देत घेत वाटीत निघाला होता!🚩
माऊली!माऊलीचां गोडवा अंतरंगी उतरत होता!हे मधुरपण कधी संपूचं नये असं वाटतं होतं!पालख्या हळूहळू हडपसरकडे मार्गक्रमण करीत होत्या!सत्संगाची गाठोडी घेऊन हरी गजरात भक्ती संप्रदायाच्या दिंड्या गाडीतळाजवळ पोहचल्या होत्या!जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज अनभक्ती संप्रदाय पाया रचनारे श्रीमाउलींचं हडपसर येथे विसावा ठिकाण आलं होतं!अर्धांएक तास विसावा घेऊन मार्गस्थ होण्यापूर्वी लाखो भक्तजन संतश्रेष्ठांचे,जगदगुरूंचे दर्शन घेत होते!स्वतःस आतून उजळून घेत होते!संत स्पर्शाने विठू दर्शन होतं असतं असं म्हणतात!अंतरंगी भक्तीआनंदाचां अनुभव घेत होतें!दर्शनाने लोखंडं सोनं होतं गेलं होतं!पंढरपूरात चंद्रभागेतिरी अनंत काळापासून विटेवरी उभा असलेल्या श्रीविठू माऊलींच्या दर्शनाभिलाषी, तहान भूक विसरलेला वारकरी भक्ती आसं घेऊन उमेदीने निघाला होता!पालखी सोहळ्यातील वारकरी ‘माऊली!माऊली ‘ म्हणत दिंड्यातून निघाली होती!दिंड्या अनेक होत्या!वारकरी अनंत होते!वारी करायची होती!कित्येक वेषी,अनंत रूपे विठू सागराला भरती आली होती!मन, बुद्धी अन अंतःकरणात श्रीनारायण विसावला होता!मन मंदिरी विठूपाठ सुरच होता!
वैष्णवांचां विशाल रुपी विठ्ठल मनी तो नांदत होता!चोखोबांची अतूट भक्ती,गोरोबांची पक्की मडकी!सावतांचा फुलला मळा.. सारे सारे रंगले होते!विसरून संसारदुःख भजनानंदी भिजत होते!पालख्या भक्ती रसात भिजवून गेल्या!टाळ मृदूंग विठ्ठल झाल्या!विणेचां तो मधुर सूर,श्रवण देऊनी निघुनी गेल्या!
विसावा हडपसर येते घेऊन…माऊली निघुनी गेली दिवे घाटातं!वेडावाकडा हिरवळीत लुप्त घाट दिव्याचा सुंदर होता!घाट वळणावळणाचा होता!थाट त्याचा निराळा होता!माऊलींच्या पालखी सोहळा,मध्येचं होई पाऊस सडा!वारीतून वारकरी घेई दैनंदिन नवीन धडा!भक्तीचा तो अफाट सागर,घाटा घाटातूनी चालत होता!हिरवाईतं ती भगवी पताका उंच उंच डोलत होती!परके कोण नाही त्यात माऊली होते नातं साथ!सासवड मुक्कामी पालखी थांबली!श्रीसोपान काकांच्या नगरीत विसावली!अलंकापुरीचा राजा माऊली, पालखी बंधू भेटी कऱ्हेत नाहाली!
जगद्गुरुंचीं पालखी हृदयस्थ झालीं! विसावा घेऊनि पालखी निघाली!निघून गेली लोणी काळभोर,उरुळी कांचन!वारकऱ्यांमुखी गजर होता!भक्तीचा अलोट सागर होता!पालख्या दिंड्या जातं होत्या!विठू भेटीची आसं होती!आमच्या नजरा पाहात होत्या!नजरा हळुवार वाहात होत्या!वारीचा वेगळा थाट होता!भगव्या पाताका जणू सागरलाट होत्या!दिंड्या साऱ्या गंधित झाल्या!चंदनीं लेप लावुनी गेल्या!समोर पंढरपूर साध्य होतं! वारीची साधना होती!वैष्णव पताका फडकत होत्या!मी दूर दूरवर पाहात होतो!पालख्या पुढे जात होत्या!ओढ पंढरीची होती आत!वरती नभ भरून होते!तरी उघडीत नव्हते सरसर खाते!पालखी दूर जात होती!मागूनी वैष्णवपाठ पाहात होतो!मलाही भेटीची आसं होती!अखंड वैष्णव विठूदास होती!हृदयी माझ्या श्वास होते!मन ही माझे उदास होतें!दिंडी दूरदूर जात होती!प्रवास खूप लांब होता!वैष्णवपाठ दूर दूर जात राहिली!काहूर मनात उठले होते!ज्ञाना भेटीची काहीली होती!
मनमंदिरी हरी होता!अश्रू ढाळीत उभाचं राहिलो!मनोमनीं पताका झालो!फडकत गाभारी जात राहिलो!विठू भेटीची आसं होती!आयुष्य असतं सुख-दुःखपोती!वारीतून तोलूनी घेतो, सुखदु:खाची अतूट नाती!माऊलीतुनी भेटतो विठ्ठल!मायेने मग कुशीत घेतो!उजेड देतात टिमटिम वाती!गर्भगृहाचां विठ्ठल भेटला!उजेड थोंडा देत गेला!भक्तीरंग श्वासात उभा!श्रीविठ्ठल मागे पुढे घ्यावा!माऊली म्हणून डोळ्यांनी प्यावा!तू तेथेचं उभा अनंत काळ!तूझ्या विटेचा थोडा मज स्पर्श व्हावा!अनंत काळ वैकुंठी जावा!अश्रुत थोडा धुवूनी घेतो!दिंडीतूनी मलाच नेतो!चंद्रभागा तुडुंब भरली!अंतरबाह्य झाली माऊली!सद्गुण वारी वाहात राहिली!दे रें विठ्ठल दर्शन मजला!छातीत चिरूनी ठेवितो तुजला!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ जुलै २०२५