गुरु पूर्णिमा
माझे प्रिय गुरूजन!
गुरू कुणाला म्हणावे?
मला काहीच कळेना
गुरू धाकटा असावा
की तो मोठा आकळेना
नानाभाऊ त्यांचे नाव
जरी वयाने लहान
पण ज्ञान पाहू जाता
फार वाटती महान
गुरू दुसरे प्रकाश
भाषा अहिरानी गोड
भावोत्कट दर्जेदार
तिला नाही मुळी तोड
गुरू तिसरे अजय
कवी लेखक गायक
उंच धिप्पाड देखणे
जातिवंत ते नायक
चौथे गुरूजी सिराज
गझलेचे जाणकार
नम्र स्वभावाचे धनी
लिहितात शानदार
यशवंत हिराबाई
पिता त्र्यंबक पगारे
गुरू माझे ते पाचवे
गझलेत रमणारे
सुप्रसिद्ध चित्रकार
लिलाधर कोल्हे सर
गुरू माझे ते सहावे
त्यांना माझा नमस्कार
नाशिकचे काशिनाथ
त्यांचे कूळ महाजन
गुरूवर्य ते सातवे
लिहितात फार छान
गुरू आठवे उद्धव
असे वास्तव्य पुण्यात
उर्दू भाषेचे विद्वान
हात खंडा लिहिण्यात
गुरू नवव्या स्थानाचे
बहू दिसती सुंदर
फार दांडगे अभ्यासू
नाव बापू हटकर
गुरू शोभती दहावे
बापू मोहन भामरे
भल्या भल्यांना म्हणती
थोडा जागीच थांब रे
विश्रामजी बिरारींची
आहे रत्नात गणती
अकरावे गुरूजन
काय वर्णावी महती
जितेंद्रजी देसलेंचा
आहे आम्हा अभिमान
अकपचे सेवेकरी
देतो बारावा सन्मान
आणखीही गुरूजन
ज्यांना नित्य मी स्मरतो
आज नाहीत हयात
परी नमन करतो
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

गुरुपौर्णिमा कविता
गुरुवंदना
***************
हाई दुन्यादारी देस
माले पूरंपाठं ग्यान…
तिले नमाडस माथा
तिले झुकाडस मान…
तीच खराखाती गुरु
आपी आर्धवट चेला…
अर्धी पखालले भरी
सांडे रस्ताव्हर हेला…
—————————
गुरुपौर्णिमेनिमित्त……
खूप खूप शुभेच्छा……
सुप्रभात
प्रकाश पाटील