कौतुक
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
कौतुक
ना लागत पैसा ना आडका,
कराया मुक्त कंठे कौतुक,
मार्ग सोपा नाहीका?
विवेक विचार बिनचूक. 1
चांगल्याला चांगले,
सदैव म्हणत जावे,
कोणी कसेही वागले, क्षमाशील असावे 2
तमोगुणालाही क्षमा करावी,
जाणीव जागवावी तयाची,
रजोगुण झुलताच राही,
झूलू द्यावे पर्वा न त्याची3
शिकविण्याच्या फंदात,
तयास न पडावे,
थकले तयांपुढे संत,
राजोगुणींना तयांवर सोडावे4
बौध्दमुनी ते येशूपर्यंत,
क्षमा आणि विसरा,
हा मंत्र बनवी गुणवंत,
सत्वगुण हाच खरा 5
तयासी ना उणे काही,
तरीही जीवा त्रास होई,
संयम सोडायचा नाही,
जीतेपणी मोक्ष नसावी घाई6
कांस ज्ञानवैराग्याची धरावी,
अंतरी सदैव नामस्मरण असावे,
हीच गुटीका सदा प्रशावी,
परी क्षणो क्षणी सावध असावे.7
येतील प्रसंग,आतिप्रसंग,
निघून जातील बाजूने,
सोडू नये कधी सत्संग,
काळच गुणकारी औषध जुने.8
वाट पहावी परी आशा धरु नये,
अंधाराने अंधाराचे,प्रकाशाने,
प्रकाशाचे काम सोडू नये,
चालावे सदगुणांच्या आधाराने9
संसारातून परमार्थी बनावे,
सर्व साधूनी द्वैतातील,
अध्यात्मिकही व्हावे,
यथाशक्ती होणार धर्मशील. 10
हाची सदैव महामंत्र सुखाचा,
जमल्यास अंगीकारावा,
आग्रह अजिबात नाही आमचा,
न पटल्यास आम्हा परत करावा. 11
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
चिंतनशील
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी