आई marathi kavita

आई
आई

आई marathi kavita

🙏🔆 आई🔆🙏

आई तूच वेद,
तूच पुराण,
असो-नसो,
नित्य स्मरण1

तूच गीता,
तूच सर्वस्व,
वाचावे तव,
तुझेच वर्चस्व

एकांत बसता,
मूर्ती करुणा,
तियेत दिसते,
बुद्धाजैसी दयाघना

येता जाता,
गेल्यावरही,
सावली दिसे,
गहिवरही4

हृदय ओलवी,
भिजतो मी,
आठवात तुझ्या,
खूप रडतो मी

मन न भरे,
ते तव गुण गाते 

कसे गं जमते?
वेदना गिळते?

मुखकमल हसरे राहते,
आम्ही गं किती अज्ञ?
तरीही तव छळतो,
का नाही आम्ही सुज्ञ

लागता आम्हा ठेच,
किती गं विव्हळते?
टचकण आसू गाळते!
आम्हा सुख देते

देवही गातात,
महिमा तव,
कुणी म्हणून गेला,
आई मर्मबंधातली ठेव
.
स्वामी तिन्ही जगाचा,
आई विना भिकारी,
ऐसा दुजा म्हणे,
गोष्ट आहे खरी

संपले मम शब्द,
शाई लेखणीतली,
गुण -ऋण किती?
आयुष्य काया झीजली

गाता,लिहिता,
जरी जोपसली,
सात जन्माची,
पुण्याई पसरली
                                                         
इतुके नसे थोडके,
सोलून दिली काया,
फिकेचं तयालागी, 

अमोघ  तव माया

आता थांबतो गं आई,
थकलो आता मी फार,
धावत तिथून सत्वर,
घे कुशीत ये अवनिवर

🌿मायवेडा🌿
मझिसु✍🏻🌷प्रा. मगन सूर्यवंशी

आई
आई