हल्ली जग बिघडलय की घडलंय

समिक्षा भावमंजिरी
समिक्षा भावमंजिरी

हल्ली जग बिघडलय की घडलंय

हल्ली जग बिघडलय की घडलंय
नेमकं काय समजाव
माणूसपण नसलेल्या माणसांना 
फक्त एकसारखं पहात रहावं

जिकडे बघावं तिकडे गर्दी असते
इथून तिथे एकसारखी धावपळ दिसते
कोणी कुणाशी बोलत नसतो
प्रत्येक माणूस माना खाली घालून
फक्त मोबाईल मधे व्यस्त दिसतो
हा मोबाईल हातात आल्यामुळे
माणूस कुठेतरी हरवलाय
मोबाईलच्या चक्रव्यूहात फसून
माणसापासून दूरावलाय

घरात असतात तरी
एकमेकांचे नसतात
एकमेकांसोबत राहूनही
लांब लाब दिसतात
बाहेरून घरी आले की
एकमेकांना बघायचं
न बोलता आपापल्या
खोलीत शिरायचं
कोणाला कोणाशीच काही
देणं घेणं नसतं
एकमात्र मोबाइलच
त्यांचे विश्व असतं

पुर्वी घरात सगळे सोबत एकत्र रहायचे
सर्वांसोबत सर्वजण
शूभंमकरोती म्हणायचे
देवाधर्माच्या गोष्टी सांगून
घरातल्यांचा आदर करायचे
कुटुंबवत्सल घर अगदी
गुण्यागोविंदाने नांदायचे

जेवनावेळी सारे सोबत
संगतीने जेवन करत होते
दिवसभराच्या घडामोडी
हसतखेळत सांगत होते
जेवता जेवता कितीदा
हास्यकल्लोळ व्हायचा
घरामध्ये कसा आनंदाचा
सुगंध दरवळायचा

हल्ली सातच्या आत घरी
कोणी येत नाही
घरच जेवन कोणी खात नाही
संवाद तर कुणामधे होतच नसतो
वडील जेष्ठांचा धाक भिती भय
कुठेतरी बासनात
गुंडाळून ठेवलेला दिसतो

हल्ली घर असुन ही घराला
आत घरपण राहिले नाही
घरात सर्वंजण एकत्र असतात पण कुणामधेही आपलेपण दिसत नाही
मोबाईल हाती घेऊन सारेच कसे
एकमेकांपासून दुर दुर पळतात
स्वतःच्या आत्मसन्मानाला
जाळत असतात
खरतर एकमेकांमधला जिव्हाळा
आपुलकी प्रेम सारेकाही नाहीसे झाले
माणूसकी विरहीत माणसं शिल्लक राहिले
अहो हल्ली तर पाळण्यातच
बाळाच्या हाती मोबाईल येतो
बाळाचं बालपण हरवून घेतो

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *