सत्य शोधक कवीता
सीमा नाही झिजण्यास
सत्य शोधिका चला ग
चला सत्य शोधण्यास
काय पुजिता धन्यास
दास्यत्वाच्या जगण्यास॥धृ॥
सारे उपास तापास
सांगा हवेच कशास
सारं जीवनच त्यात
पहा होत आहे पास॥१॥
कोण पाहते आमुच्या
अशा अखंड तपास
आम्ही सावित्रीच्या लेकी
हवे सत्य शोधायास॥२॥
सत्य शोधण्याची आस
एक तोच हवा ध्यास
साथ किती काळ द्यावी
सातत्याच्या अन्यायास॥३॥
जोति साऊंनी दिलेल्या
स्विकारुया शिक्षणास
अज्ञानाच्या एक एक
करु विरोध क्षणास॥४॥
सत्य शोधा होत नाही
कधी सत्याचा विनाश
ध्यानी मनी घ्या सख्यांनो
सत्या ठायी अविनाश ॥५॥
किती काळ पुजणार
घरदार नि धन्यास
किती काळ झिजणार
सीमा नाही झिजण्यास॥६॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.
