संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
श्रीमाऊलींचां सुवर्ण पिंपळ
नानाभाऊ माळी
रसपूर्ण बोलणें कानी ऐकून अंतरंगात उकळी फुटु लागते!हळूहळू अमृतरस पाझरू लागतो!हळुवार श्रवणातून हृदयी येऊन विसावू लागतो!सत्यस्पर्श अंतरंगी प्रफुल्लित होऊन एकजीव होऊ लागतो!चित्त स्थिर होऊ लागतं!चित्त मंत्रमुग्ध होऊन जातं!कर्णमधुर वाणीचां अमृतरस नादब्रम्ह होऊन स्वाभाविकपणे ऐकणारा तृप्तीच्या कळसाला येऊन पोहचतो!शिखरावर येऊन पोहचतो!त्या ब्रम्हनादाची भक्तीधून एकचित्त होऊ लागते!लागलेली ही टाळी अनंतातं ब्रह्मलीन होते!
मधुरवाणी अर्थ सांगू लागते!सुख- दुःखाच्या पलीकडे गेलेलं चित्त आनंद लहरींवर तरंगू लागतं!ब्राम्हदेवाने अमृतरस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयी ठेवला असावा!सुख-दुःखाचा जीवनार्थ उकल करून सांगण्याची जबाबदारी दिली असावी!ही उकल कांद्याच्या आतील स्तरांप्रमाणे व्यवस्थित उलगडत जावा तसा असावा!एक एक स्तर उलगडत राहावा!हृदयातला अर्थ नयनी यावा!नयनातुनि अश्रूधार सुरू व्हावी!वात्सल्य करुणामूर्ती श्रीज्ञानदेव अनुभूती उकल करू लागतात!मुख कमलातून एक एक शब्द प्रसवत जावेत!डोळ्यातून करुणा सागर रीता होऊ लागतो!
गुरुमाऊलीं निवृत्तीनाथांचीं आशिर्वादी आज्ञा घेत भागवत फळ ज्ञानोबा माऊलींच्या वाणीतून ‘भावार्थ दिपीका’ पाझरत रहाते!ज्ञानेश्वरी पाझरत रहाते!सकळ तें प्रकटू लागतं!सकळजन ज्ञानार्जन करू लागतात!जगकल्याणा भक्तीभाव पांडुरंग चरणी अर्पण होऊ लागतो!
एक एक अमृतथेंब प्राशून घ्यावा असं तें शब्दसार हृदयात जाऊन ‘भावार्थ दिपीका’ अवघड जड जे साध्या सरळ निरामय शब्दात सर्वसामान्यांच्या हृदयाला स्पर्श करू लागतात!श्रीज्ञानेश्वरींचें ज्ञानकण कानी पडू लागतात!संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर मानवी जीवनाचा जगण्याचा अर्थ सांगू लागतात!तें सद्गुण जनसामान्य स्वीकारू लागतात!श्रीज्ञानेश्वरीतील सतजीवनमूल्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट होऊ लागतात!सुख-दुःखाचे वाटसरू भक्तीतं एकजीव होऊन जातात!’भावार्थ दिपीका’ शांत रसातून अमृतधारांचा वर्षाव करू लागते!डोळे चिंब भिजतात!भाव भावनांचा करुणझरा डोळ्यातून वाहू लागतो! मनामनाला शुद्धीपत्रे वाटीत नव चेतनेचा जागर होऊ लागतो!दीन दुःखीतांनां डोळस करुन महान कार्य घडू लागतं!

सुवर्ण पिंपळ तेथेचं उभा राहून सत्संगाची ग्वाही देत उभा असतो!शब्द न शब्दार्थ उलगडत जातात!चौघे बहीण भावंड तात्विक सत्यस्पर्शी ब्रह्मज्ञान उलगडून सांगतात!वात्सल्यमूर्ती करुणेचा सागर ज्ञानोबा माऊली शांत रसात भक्तीआमृत ओतून कारुण्य विशद करू लागतात!
शतकांमागून शतकं मागे जात आहेत!सात्विकधारा अनंत काळापासून वाहते आहें!सुवर्ण पिंपळ तेथेच उभा आहें!सुख-दुःखाच्या अनंत लाटा येऊन गेलेल्या असतील तरीही साक्षीदार म्हणून विनम्रपणे तेथेच उभा आहें!
भागवत धर्माची,अध्यात्माची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन संत परंपरा अजरामर झालेली असतांना सुवर्ण पिंपळ आपल्या सर्वात उंच फांदीला भागवत धर्माची पताका घट्ट बांधून तेथेच उभा आहें!सद्संगतीचा संदेश देत कित्येक शतकं उभा आहें!आत्मिक सुखाची व्याप्ती वाढवत तेथेच उभा!श्रीज्ञानेश्वरांनी रचलेला पाया होता!श्रीएकनाथांनी तो पुन्हा भक्कम केला!जगद्गुरूंनी कळस चढविला तरी तो तेथेच इंद्रायणी तटावर, माऊलींच्या संजीवन समाधीजवळ उभाच आहें!संत, साधू, महंत अश्रूमोतीचां अभिषेक करीत असावेत!तो तेथेच साक्षीला उभा आहें!निरामय जीवनाची उकल करण्यासाठी कित्येक शतकं उभा आहे!सदाचाराचां मुखसाक्षी होऊन जागेवरचं उभा आहें!होय आळंदीतील सुवर्ण पिंपळ कित्येक घटनांचा साक्षीदार म्हणून कित्येक शतकं उभा आहें!
संतशिरोमणी श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या आध्यात्माला निरूपणाची भागवती पताका पुढे नेण्यासाठी अनेक संत साहित्यिक,योगाचार्य, महंतांनी आपलं जीवन समर्पित केले आहें!तेचं भागवती अमृतरस अलीकडे त्यातीलचं एक संत साहित्यिक, प्रसिद्ध लेखक,ज्यांचे ५०च्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत,श्री.लक्ष्मण सूर्यभान घुगे सर आळंदीचीं भागवती पताका घेऊन मार्गस्त झालेले आहेत!भागवत धर्माचीं भगवी पताका खांद्यावर घेऊन निघाले आहेत!त्यांच्या ग्रंथापैकी श्रीज्ञानेश्वर माऊलींवर निरूपण असलेला ग्रंथ “सुवर्ण पिंपळ” चिंतन, मंथन करायला भाग पाडतो!
भक्तीरसात चिरंतन डुबकी घ्यायला लावणारे आदरणीय श्री.लक्ष्मण सूर्यभान सर पंढरपूर निवासी श्रद्धाआराध्य विठ्ठलभक्त ज्ञानोबा माऊलींचां बोट धरून “पावन पवित्र सार्थ ज्ञानेश्वरीं” घेऊन निघाले आहेत!”योगी पावन मानाचा” घेऊन निघाले आहेत!”सुवर्ण पिंपळ” हृदयाशी धरून श्री.ज्ञानेश्वर माऊलींचा अमृतसार सांगत निघाले आहेत!
दिनांक २८ मे २०२५ रोजी आम्ही पुण्यातील घोरपडी येथील रेल्वेतं असलेल्या श्री. बा. ह मगदूम सरांच्या सेवानिवृत्ती समारोहाला गेलो होतो!लोको डिझेल इंजिन शेडमध्ये तें नोकरीला होते!तेथेच वरिष्ठ टेक्निकल टेक्निशियन असलेले मित्रवर्य आणि संत साहित्याचें नामवंत लेखक श्री लक्ष्मण सूर्यभान सरांची योगायोगाने अचानक भेट झाली!पांडुरंगाणेचं भेट घडवून आणली असावी!म्हणून त्यांचं दर्शन झालं असं म्हणावे लागेल!ज्ञानयोग्यांचा,श्रीज्ञानदेवांचा सार्थ निरूपण लिहिणारे हे योगी लेखक योगायोगाणे भेटलें!आमची भेट होऊन ७-८ वर्षं झाली असतील!
श्री. लक्ष्मण सूर्यभान घुगे सरांचं चेहेरातेज ज्ञान प्रकाशाने तेजळला असावा जणू!जुळून आलेला तो क्षण पूर्णतः त्यांच्या सोबत घालवीला होता!मला तर साक्षात विठू माऊलीचं भेटले होते असं वाटत होतं!विठू माऊलींची सावली ज्ञानदेवांवर पडली असावी!ज्ञाना माऊलींची सावली श्री लक्ष्मण सूर्यभान सरांवर पडली असावी!त्यांचं तें सावळे मनोहारी रूपात श्रीहरी विठ्ठल पहात होतो!शांत, शीतल, तेजोमय असं त्या निश्चल रूपात श्रीज्ञानोबा माऊलींचां सुवर्ण पिंपळ दिसत होता!त्यांच्या बोलण शांत सागरासारखं वाटत होतं!कुठलाही मोह नाही, विरोध नाही असा श्रीमाऊली भक्त डोळयांत भरून निघालो होतो!मी धन्य धन्य झालो होतो!
नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०१ जून २०२५