शिक्षक ज्ञानोपासक असतो

शिक्षक ज्ञानोपासक असतो

शिक्षक ज्ञानोपासक असतो

नानाभाऊ माळी

आई असतें आमुची
दुसरी संस्कार शाळा
फुलवती दोघी मळा
काळजाचां लळा!

निर्मळ निष्पाप मुखी
गुरुजन धन्य होती
शब्द अंक फुलती
विध्यार्थी जन्म घेती!

उगवतो सूर्य नवा
भाजतो तप्त तवा
मिळे गुरुमुखे ज्ञान
मिळतो रोज दुवा!

गुरुजी ज्ञानकाठी
जगात असतें मोठी
बसते पाठीवरती
उघडे ज्ञान ताटी!

गुरुजी दूरदृष्टी
उगवी सूर्यप्रकाश
सारुनी अंधार सारा
दिसें निरभ्र आकाश!



रस्त्यावरून जातांना गुरुजी दिसलें की विध्यार्थी नतमस्तक होतं असतात!गुरुजीं विद्यादान देऊन ज्ञानडोळे प्रदान करतात!डोळे देणारे,उजेड देणारे गुरुजन,कधीही न पाहिलेल्या ईश्वराचे दूत असतात!अंतःकरणातून शिकविणारे शिक्षक आदर्श असतात!शिक्षकांनी दिलेली ज्ञानझोळी घेऊन विध्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात स्व-साध्यासाठी गेल्यावर ज्ञानझोळीचं मुख उघडून एक एक साध्य जीवनभर वापरायचं, त्यातून यशस्वी होत राहायचं!

आई वडिलांच्या संस्कारांनी वाटचालीस सुरुवात होते!गुरुजींचे संस्कार परिपूर्णतेकडे घेऊन जातं असतात!मार्ग दाखवीत असतात!विध्यार्थ्यांच्या बालमनावर अक्षर कोरणारे शिक्षक कलाशिल्पी असतात!एक एक अक्षर मनावर कोरले गेल्यावर जीवनभर साथसंगत करणारे शब्द, दिलेलं निःस्वार्थ दान असतं!

गुरुजी निःस्वार्थपणे शिकवीत राहतात!विध्यार्थी घडत राहतात!विध्यार्थी एक एक वर्ग पुढे जाऊन, शेवटच्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळा सोडून निघूनही जातात!पक्षी उडून जावं तसें प्रत्येकवर्षी घडलेले विध्यार्थी निघून जातात!गुरुजीचां ज्ञानहोम अखंड पेटलेला असतो!ज्ञान भट्टी अव्याहतपणे धगधगतं  असतें!कच्चे मडके भाजून पक्के करून बाहेर काढायचं!गुरुजी ज्ञानकुंभार असतात!भट्टीलोहार असतात!लाकूडसुतार असतात!सुबकसे दागिन्यावर बारीक बारीक अस्सल सोनेरी अक्षरं गिरवणारे सोनार असतात!कधी कधी देवगृही फुलं ठेवणारे माळी असतात!

विध्यार्थी शिकून निघून जातात!शिक्षक शिकवीत राहतात!शिकवीत शिकवीत वयोमानाप्रमाणे शिक्षक देखील सेवानिवृत्त होत असतात!सेवेतून पेटविलेला ज्ञानहोम एक दिवस दुसऱ्या हाती देऊन शाळेचा निरोप घेतात!इतकी वर्षं विध्यार्थी घडविणारं हृदय द्रवतं राहतं!शब्दांचे मोती मुखे बाहेर पडतं असतांना डोळ्यातून अश्रूमोती गालांवर घरंगळतांत!विध्यार्थी अन शाळाचं विश्व मानणारे शिक्षक आपल्या भूतकाळात जाऊन डोकावू लागतात!भर उमेदीच्या काळापासून ‘हित’ हा मंत्र घोकत राहून,इमानदारी, प्रामाणिकपणा सेवेच फळ मानतात!

विध्यार्थी नावाच्या वाढणाऱ्या पिकास, सेंद्रिय शुद्ध विचारखत,संस्कार औषधांची फवारणी करीत सुसंस्कृत, सुसंस्कारीत करून जोमाने वाढण्यासाठी गुरुजी कष्ट घेत असतात!असे काळीज ओतून शिकविणारे गुरुजी सेवानिवृत्त होतांना इतरांच्या डोळ्यात अश्रू तरळतात!एक ज्ञानतपस्वी उद्यापासून शाळेत येणार नाही ही भावनाचं सहन होत नसते!विध्यार्थी,सहकारीअन शिक्षक एक परिवार होऊन जातो!परिवारातील एक सदस्य सोबत नसल्यावर त्याची कमी क्षणोक्षणी जाणवत राहते!

अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले असतील!अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार असतील!होत राहतील!त्यांनी घडविलेले विध्यार्थी पुढे विशाल ऋणात राहतील!झटून शिकविणे,शाळेचां दर्जा, गुणवत्ता टिकवून ठेवणे हे सर्वस्वी हाडाच्या शिक्षकांवर अवलंबून असतं!शिक्षक अश्रूमोती असतात!आपण ते तीर्थ म्हणून ओंजळीत घेण्यातील समाधान ईश्वरभेटीसारखं असतं!

परवा ०३ मे २०२४,शुक्रवार होता! पूर्व क्षितिजाकडून सूर्य उगवत होता!सूर्य वर येता येता उन्हाची ओळख करून देत होता!महात्मा फुले विद्यानिकेत संस्था, ससाणेनगर, हडपसर पुण्यातील असाचं एक काशिनाथ पुत्र श्री.लक्ष्मण मुळे सर सेवानिवृत्त झाले!३१वर्षं ज्ञान दानाचा दिर्घानुभव देत घेत सेवेच्या परिपूर्तीने सेवानिवृत्त झालेत!जुने घेत,नवे स्वीकारित ज्ञानदानाच्या पर्वाचां सेवापुर्तीने विराम घेतला!

श्री.मुळे सर मुळातच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील!डी.एड करून मराठी भाषेची ओढ हृदयी बानवून १९९३ साली शिक्षक म्हणून ‘महात्मा फुले संस्थेत’ सेवा देण्यासाठी रुजू झाले!भाषेची अडचण सोडवत कृतिशील, बहुआयामीव्यक्तिमत्व, जिव्हाळा अन आपुलकीच्या साथीने विध्यार्थी, पालक, संस्था अन सर्व सहकार्यांच मन जिकंत राहिले!शिक्षक आयुष्यभर ज्ञानदानाच काम करीत राहतात!हे ईश्वरी पवित्र कार्य असतं!इतर कुठल्याही खात्यात पहायला मिळत नसतं!विध्यार्थी घडविण्यातून आदर्श समाजाची निर्मिती होत असतें!असं शुद्ध पवित्र कार्य जीवनभर करीत श्री.लक्ष्मण मुळे सर सेवानिवृत्तीनें एक विराम घेऊन थांबले!अर्थात थांबले नाहीत तर त्यांची सेवानिवृत्ती खात्यात बदली झाली!आयुष्यभर प्रामाणिकपणे शाळा अन विध्यार्थी नावाचे धागे शिवत राहिले!माणसांची नाळ माणसांशी जोडत राहिले!शिक्षकांतील गुणवत्ता सिद्ध करीत संस्कार करीत राहिले!आपुलकीने माणुसकी धर्म शिकवत राहिले!

व्यक्ती निकट येतं नाहीतं तोपर्यंत कळत नसतो!स्वभाव कळल्यावर, जुळल्यावर माणसांची नाळ जोडणारे शिक्षक डोळ्यासमोर येतात!श्री.मुळे सर मदतगार मुख्याध्यापक होते!
स्वयंशिस्त गुरुजन असतात!स्वतः घडतांना विध्यार्थी घडवणारे श्री.मुळे सर आदर्श शिक्षक होते!शाळेचां नावलौकिक होण्यासाठी समर्पित भावनेने शिकवीत राहिले!शिक्षक आयुष्यभर ज्ञानदान करीत असतो!श्री.मुळे सर खारीचा वाटा उचलीत कृतज्ञता जपत राहिले!संस्था आणि विध्यार्थ्यांमध्ये सेतू होत राहिले!चैतन्य निर्माण करीत सतत मार्गदर्शन करीत राहिले!लहान मुलांच्या अभ्यासातील समस्या सोडवित त्यांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष्य देत राहिले!विध्यार्थ्यांच्या प्रगतीतून स्वतःची प्रगती साधत राहिले!असे शिस्तप्रिय शिक्षक समाजाचे आदर्श असतात!चांगलं तेचं करीत असतात!

श्री.मुळे सर अध्यात्मिक विचारांचे आहेत!भक्तीतून ज्ञानोपासना जीवन उपासना असतें!विध्यार्थ्यांची आई वडिलांपेक्षा काकनभर जास्तच गुरुजनांवर श्रद्धा असतें!भक्ती असतें!
श्री.लक्ष्मण मुळे सर विध्यार्थीप्रिय शिक्षक होते!आपला आदर्श समोर ठेवून ज्ञानदान हे पुण्यकर्म सतत सुरूच राहिल!पवित्र होम सुरूच राहिल!आपल्या सेवापुर्ती,सेवानिवृत्ती निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा!आपणास भावी आयुष्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०५ मे २०२४

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *