शब्दात जीव ओतणारें कलाकार
शब्दात जीव ओतणारें कलाकार
नानाभाऊ माळी
पुस्तकात बंदिस्त असणारे मुके शब्द जीवंत होतात!शब्दांना वाचा फुटते!शब्द अभिनयात एकरूप होतात!अभिनेता शब्दात प्राण ओततो!शब्द दुडूदुडू नाचू लागतात!शब्द रसिकमान्य होतात! ती कलाकृती अजरामर होते!चिरंजीवी होते!चिरकाल टिकते!
कवी,लेखक,नाटककार शब्दांना जन्म देत असतात!दिग्दर्शक, गीतकार, कलाकार,अभिनेता शब्दात जीव ओतीत असतात!कलाकार शब्दांत प्राण टाकत असतॊ तेव्हा ती कलाकृती रसिक प्रिय होतें!रसिकमान्य कलाकृतीतून कलाकार घडत असतो!शिकत असतो!रसिकजणांचं मनोरंजन करतो!
कलाकार उत्कृष्ट अभिनयानुभवातून शब्द साच्यात बसवीत असतॊ!शब्द अजरामर करीत असतो!विशिष्ट लकब, हावभाव अन शब्द फेकीतून कलाकृती श्रीमंत होत जाते!अजरामर होते!शब्द शक्तीवान होतात!त्या जीवंत कलाकृतीचा दिग्दर्शक यशस्वी होतो!मायबाप रसिकांच्या गळ्यातील ताईत होतो!त्या कलाकृतीला न्याय सन्मान मिळालेला असतो!

शब्दास जन्म देणारे लेखक अन जीवंत अभिनयातून कलाकृतीचा झेंडा उंचावर नेणारे कलाकार हातात हात घालून एकत्र येतात!अभिरुची संपन्न नाटक, चित्रपट, एकांकिका नावारूपाला येते!कलाकृती अन कलाकार यशस्वी होतात!प्रेक्षक डोक्यावर घेऊन नाचू लागतो!रसिक मायबापचं खरे परीक्षक असतात!रंगदेवता,शारदेच्या,नटराजाच्यां आशीर्वादाने, कृपाभिलाषी होऊन उत्तम कलाकृती साकार होत असते!
पुण्यातल्या हडपसरमधील ‘स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह कलाकारांचा परिवार’.. एकत्र येऊन अभिरुची संपन्न नाट्यप्रयोग करीत आहेत!वेगवेगळ्या व्यक्तीरेखेतून प्रायोगिक, हौशी नाटकं,एकांकिका सादर करून राज्यपातळीवर अनेक पुरस्कार मिळवीत आहेत!एक दिलाने एकत्र येऊन संस्थेची स्थापना झाली!मूर्त रूपा नंतर लेखक, कवी, रंगशारदेचे उपासक कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याठी जन्माला आलेला परिवार आहे!
कलाकारांना,साहित्यिकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून रंगशारदेच्या दरबारातील या कलाकारांच्या अडी अडचनणी समजून घेत उपाययोजना करण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेंली आहे!नाट्य प्रयोग अन कलाकारांच्या समस्यांनां वाचा फोडण्यासाठी ‘स्व.विठ्ठलराव तुपे नाट्यगृह परिवाराने’ कार्यास सुरुवात केलेली आहे!
काल रविवारी या नाट्यगृहात जाण्याचा योग आला!अनेक मित्र अन कलावंत हृदयातले वाटले!अनेक नामवंतांची, नामांकित कलाकारांची ही संस्था भविष्यात श्वास होणार आहे!मनापासून काम करणारे!स्वतःस झोकून देणारे कलाकार रसिकांचे डोळे होतील अशा शुभेच्छा देतं अभिरुची संपन्न नाटकं देऊन नावलौकिक वाढवेल असा आशावाद अन हृदयातल्या शुभेच्छा!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१४ ऑक्टोबर २०२४