प्रेमाच्या मराठी कविता

प्रेमाच्या मराठी कविता

प्रेमाच्या मराठी कविता

तुझा सहवास म्हणजे
न कळतं भेटलेला भावनांचा झरा
तुझ्या सोबतचा प्रवास म्हणजे
तुझ्या नजरेने दिलेला प्रेमळ इशारा

किती खळखळ हसते गं
तुझ्या गालावरची खळी
हळूवार अलवार स्वार होते
जणू तुझ्या होठांवर चाफेकळी

तुझा तिरकस कटाक्ष टाकन म्हणजे
जसा गोड गुलाबी वारा
सागराने मिठीत घ्यावा
असा तो लाडावलेला किनारा

तू ना खूप छान दिसतेस
बट केसांची मागे घेऊन बघतेस
रूप तुझं लावण्याचं जणू नक्षत्रांच देणं
लाजताना ओंजळीत लपवून घेणं

तुझं सौंदर्य म्हणजे
चंद्राला चांदण्यांच्या पहारा
तुझं दिसणं म्हणजे
नकळत मिठीत घेणारा शहारा

तुला ना एकसारखं बघावं
डोळ्यात भरून घ्यावा
गारवा ही  तुला  छेडतो
काय त्याचा अर्थ कळतो

खरचं तू म्हणजे ना
चिंब चिंब भिजलेली वसुंधरा
तुझ्या वेणीवरचा गजरा म्हणजे
मिणमिणत्या काजव्यांचा निवारा

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
‌९५७९११३५४७
९४२२८९२६१८

Marathi Kavita Aai

नारीशक्ती

सत्य शोधक कवीता