तुझ्यासारखा तूच देवा
तुझ्यासारखा तूच देवा, तुजसम दुजा नाही,
तूच वाहतो चिंता जगाची, तू करुणेने पाही.
अनंत तुझी रुपे जगती, अनंत तुझी नावं,
त्यासच तू दिसतो ज्याचे, हृदयी तुझा भाव.
कधी होतो थेंब इवला, नदी नाल्यातून वाही.
तूच वाहतो चिंता जगाची, तू करुणेने पाही.
वक्ष-वेली तुझीच रुपे, तुझ्या कृपेची साक्ष.
पशू-पक्ष्यांना तूच राखतो, होतो तू विरुपाक्ष.
जोवर आहे कृपा तुझी, मृत्यू तयाला नाही,
तूच वाहतो चिंता जगाची, तू करुणेने पाही.
कुणास देतो माया, कुणास काळीज उलटे,
स्वार्थ पाहूनी कां कोणाची, वृत्ती येथे पलटे,
तऱ्हेतऱ्हेची इथे माणसे, एकसम दुजा नाही,
तूच वाहतो चिंता जगाची, तू करुणेने पाही.
रहाटगाडगे चराचराचे, चाले कोण्या शक्ती,
हतबल होते भल्याभल्यांची, गर्वाची दर्पोक्ती.
रक्षण करतो तू त्याचे, दोष न ज्याचा काही,
तूच वाहतो चिंता जगाची, तू करुणेने पाही.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव
(९४२३४९२५९३)