जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा
नको मानवा रे
दुष्ट असा होवू!!
चालवुनी कुऱ्हाड
मित्र नको संपवू!!
दिली पाने फुले
दिली तुला छाया!!
मला तोडुनी तू
का संपवशी माया?
नको मानवा रे….
पर्यावरणाला राखी
केले तुला सुखी!!
फळे हवा देवुनी
सुखी केले जीवनी!!
कृतघ्न का होशी?
तोडुनी का नेशी?
नको मानवा रे…..
घरदार शेतीसाठी
माझी मदत मोठी!!
जळणाची गरज तुझी
मीच केली छोटी!!
मला संपवूनी तू
का माया करशी खोटी?
नको मानवा रे…..
रमेश महाले, शहादा.

