गाव विकायला काढले
किती निवेदन दिले
वाचून त्यांनी फाडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
नाही रस्ते नाही लाईट
नाही चालायला वाट
आश्वासनांचा वाहतोय
नुसताच कोरडा पाट
चपला झिजून झिजून
हजारदा हात जोडले
विकास शुन्य माझे गाव
विकायल काढले
पाच वर्षांनी यायचं
खोटं खोटं बोलायचं
हात जोडून मतं मागायचं
भूलथापा देऊन मन वळवायचं
अरै एक मत घेऊन यांनी
जनतेला नाडले
विकास शुन्य माझे गाव
विकायल काढले
बेरोजगारांची भटकंती असते
महागाईला लगाम नसते
शेतीला हमीभाव मिळत नाही
व्यथा वेदना कोणी समजू घेत नाही
पेपरमधे छापून आल्यावर यानी
मदतीचे फक्त फर्मान सोडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
अवकाळी पाऊस येतो
पोटाला भाकर मिळत नाही
जे पिकते ते हाती लागत नाही
खोटे पंचनामे करून हे
चॉकलेट चघळायला देतात
न मिळणाऱ्या निधीची
वाट पहायला लावताय
अरै याचे त्याचे माणसं चोरून
यांनी सारे पक्ष फोडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
ईथे तर हत्या अत्याचार
अन्यायाला न्याय नसतो
गुन्हेगार मोकाट दिसतो
झाडी डोंगर हाटेलात राहून
काहीच ओक्के होत नाही
खोक्के खाक्के देऊन घेऊन
सत्ता काही कायम रहात नाही
अरै खुर्चीवर बसून बसून
स्वतः ईतके वाढले की
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
मत घेतात ना तसे
जनतेचे ही भले केले पाहिजे
गाडीचा काच खाली करून
निदान लांबून तरी पाहीले पाहिजे
पण नाही….
गल्ली बोळात चौका चौकात
ज्याने त्याने आप आपले झेंडे गाडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७