खोटे मुखवटे
‘खोटे मुखवटे’
आरशात चेहरा निट नेटका
पाहून घ्यायचा
चेहऱ्यावर मुखवटा लाऊन घ्यायचा
सभ्य समजत नसले कोणी तरी
दिला भाव तो खाऊन घ्यायचा
चेहरा कितीही झाकला तरी
सत्य काही लपतं नाही
मुखवटे कितीही बदलले तरी
खऱ्या समोर खोटं टिकतं नाही
कितीदा पळवाटा बदलणार
एक दिवस जगासमोर येणेच आहे
कितीदा स्वतःला लपविणार
पाप पुण्याचा हिशोब तर देणेच आहे
कितीही मुखवटे लावलेत तरी
माणूस काही बदलतं नसतो
मुखवटा फाटल्यावर मात्र
खरा चेहरा सर्वांना दिसत असतो
हल्ली गर्दीत मुखवटे लाऊन
खूप माणसं फिरत असतात
माणुसकीला काळ फासून
खोटे चेहरे खरे करून दाखवत
असतात
अंगावर भारी कपडे घातल्यावर
माणूस भला दिसतं असतो
पण त्यांच्या आतल्या माणसाच्या
चेहऱ्यावर दीखाऊपणाचा
मुखवटा असतो
तेव्हा कशाला कष्टाची वाट सोडायची
आणि खोटे मुखवटे लाऊन मिरवायच
दोन घास सुखाचे मिळतात ना
मग तेव्हढेच पदरात घ्यायचं
संजय धनगव्हाळ
अर्थात कुसुमताई
९४२२८९२६१८
९५७९११३५४७