खान्देशातील देवी देवता

खान्देशातील देवी देवता

खान्देशातील देवी देवता

खान्देशातील देवी देवता!

         खान्देश हा श्रीकृष्णाचा देश आहे. ती व्यास, वाल्मिकीची जन्म भूमि आहे. इथल्या लोकांचा धर्म सुद्धा हिंदू सनातन धर्मच आहे. तरी पण काही सण आणि देवता वेगळ्या आहेत. वेगळ्या म्हणजे देव तेच आहेत काहींची नावे वेगळी आहेत. त्यांचे विधी थोडे वेगळे पण देव तेच आहेत जे हिंदू धर्मात आहेत.

       उदाहरणार्थ भालदेव हा गणपती आहे. त्याचे खरे नाव भालचंद्र पण अहिराणीत भालचंद्रला भालदेव म्हणतात. त्याचे विधी जरा वेगळे आहेत. ते नंतर कधी तरी समजून सांगतो. आज आपण फक्त कानबाई रानबाई बद्दल बोलू या.

        हिंदू धर्मात पार्वती, लक्ष्मी  आणि सरस्वती या तीन देवी मुख्य आहेत. याच तीन देवी सुद्धा खान्देशात आहेत. पार्वतीला इथे गौराई म्हणतात. ती लेक आहे खान्देशची अर्थातच शंकर खान्देशचा जावई झाला. त्यांच्यावर सुद्धा नंतर बोलेन. आज लक्ष्मी सरस्वती बद्दल बोलु यात.

         कानबाई हाई विष्णु पत्नी लक्ष्मी से. रानबाई हाई भूदेवी म्हणजे ती बी विष्णु पत्नी से. नी कान्हेर राजा हाऊ विष्णु से.
        द्वापार युगमा विष्णुनी कृष्णना अवतार लिदा, लक्ष्मीनी रुक्मिणीना अवतार लीदा नी भूमातानी सत्यभामाना अवतार लीदा. खान्देश हाऊ द्वापार युगन खांडववन से. या खांडव वनमा कान्हानी कान्हदेश वसाडा. तो खान्देश पुत्र से. त्यान्या बायका कानबाई  रानबाई या खान्देशन्या व्हवा सेत. संत कबीरना एक दोहा से,


ब्रह्मा जाती किम्हार है शिव जाती फकीर l
राम जातीका रंगडा किस्ना जाती अहीर ll
        आपण सर्व सजीव मातीची भांडी आहोत. मातीतून येतो आणि मातीत जातो. ही मातीची सजीव मडकी घडविणारा ब्रह्मा हा कुंभार जातीचा आहे. शिव शंकर जटा वाढवून अंगाला भस्म लावून फिरतो म्हणुन त्याची जात फकीर म्हणजे गोसावी आहे. राम जाती का रंगडा, म्हणजे राजपूत आणि कीस्ना जाती अहीर, म्हणजे श्रीकृष्णाची जात अहीर आहे. कृष्णाचे वंशज ते अहीर आहेत. हे अहीर लोक कान्हाच्या कान्हदेशात राहतात. हे अहीर जी भाषा बोलतात ती अहीर लोकांची भाषा असल्या मुळे तिला अहिरांची अहीरवाणी म्हणजे अहिराणी म्हणतात.

        या खान्देशात राहणारे जे आहेत त्यांची जात काहीही असो ते सर्व अहीर वंशाचे आहेत. तस ते सांगतात सुद्धा. अहीर धनगर, अहीर शिंपी, अहीर सोनार, अहीर, सुतार, अहीर न्हावी अशा सर्वच अहिराणी भाषिक जाती अहीर आहेत. वाडे ता भडगाव येथील महालिंगदास अहीरराव (कुणबी पाटील) हे सुद्धा त्यांची जात अभिर म्हणजे अहीर सांगतात. खान्देशात अहीर, अहिरे, अहिरराव अशी आडनावे प्रत्येक जातीत आहेत. तेच अहीर आडनाव श्रीकृष्णाच आहे.

कान्हा+अहेर राजा
कान्ह+हेर राजा=कन्हेर राजा
हा कन्हेर राजा खान्देश पुत्र आहे. कानबाई (लक्ष्मी/रुक्मिणी), रानबाई  (भूदेवी/सत्यभामा) या कन्हेर देव राजाचा बायका आहेत. त्या खान्देशच्या सुना आहेत दोघी.
        गौराई ही खान्देशची लेक आहे म्हणुन गौराई सणाला म्हणजे आखाजीला सर्व लेकी माहेरी असतात. तशा कानबाई सणाला सर्व सुना सासरी असतात. कानबाई जेंव्हा आपण प्रथमच घरी बसवतो तेंव्हा तिला नारळ रुपात परणून आणावी लागते. ती सून असल्या मुळे सुनेला परणून आणावी लागते. लेक परणून आणावी लागत नाही. ती सरळ आपल्या घरात जन्माला येते.

        कानबाई रानबाई या सुना आहेत. त्या आपल्या कुळातील आहेत म्हणुन त्यांचा प्रसाद जे रोट असतात ते आपण फक्त आपल्या कुळातील लोकांनाच खायला देतो. आपली लेक ही पर कुळातील असल्यामुळे तीला सुद्धा आपण रोट खायला देत नाही. गौराई लेक असल्यामुळे व ती पर कुळातील असल्यामुळे, तिचा प्रसाद शेवया सांजोर्‍या आपण कोणालाही खायला देतो.

        कानबाई परणून आणतात म्हणजे काय? ज्या घरात पूर्वापार कानबाई बसवलेली असते. त्या कानबाईला नारळ स्पर्श करून आणायचे. ते नारळ कळसावर ठेवून, त्याला नाक, कान, डोळे काढून स्त्री अलंकाराने ते नारळ मढवीले की, झाली ती कानबाई. नंतर काही लोक धातूचे किंवा मातीचे मुखवटे बनवून तर कोणी पूर्ण मूर्ती घडवून कानबाई रानबाई बनवितात.

      पण कानबाई ही तिच्या मूळ नारळ रुपात पुजली जाते. नारळ हे लक्ष्मी नारायणाचे रूप आहे. कन्हेर हा नारायण आहे तर कानबाई ही लक्ष्मी आणि रानबाई भूदेवी आहे. ही नारळ रुपी कळस रुपी कानबाई आपण चौरंगावर मांडतो, त्याच्या चारही पायांना केळीचे खांब बांधतो. सत्य नारायण आपण आसाच पूजतो.
       या कानबाई रानबाईची खान्देशातील इतर नाव रूप पहा.
1 लक्ष्मी-भूदेवी,  2 रुक्माई-राई 3 धनदाई-पेडकाई, 4 धनाई-पूनाई 5 पैसा, आडका, सोन, चांदी-शेतातील पिके, फळ फुले, तुळस इत्यादी.
       
या सोबत एक लिंक पाठवली आहे. त्यात कानबाई रानबाईची अहिराणी आरती जोडली आहे. त्यात स्वरा सोबत शब्द सुद्धा दिले आहेत. ती आरती लिहून घ्या पाठ करा आणि कानबाई पूजा वा सत्यनारायण पूजेत ही आरती म्हणा. इतरांना म्हणायला सांगा.
        आरती आवडली तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा, शेअर करा!


बापू हटकर