आखाजी की अक्षय तृतीया

आखाजी की अक्षय तृतीया
आखाजी की अक्षय तृतीया

आखाजी की अक्षय तृतीया

आखाजी की अक्षय तृतीया

शिव मद्यान्ह 

आखाजी की अक्षय तृतीया
वैदिक ग्रंथानुसार 7 अक्षय कुमार (चिर तरुण) सांगितले आहेत. या मध्ये “स्वतःच्या आईची हत्या करणारा परशुराम” ही आहे.

आईची हत्या हे स्त्री सत्तेचे मातृसत्तेत रुपांतरण दर्शविते, म्हणून मातृसत्ताक व्यवस्था नाकारून पुरुषसत्ताक व्यवस्था निर्माण करणारा परशुराम आणि इतर 6 यांच्या नावाचा अक्षय तृतीया सण वैदिक साजरा करतात.तर दुसरीकडे मुलनिवासी बहुजन समाज आज आखाजी म्हणून मातृ उत्सव साजरा करतात.

अक्षयतृतीया
अक्षयतृतीया

स्त्रीयांनी शेती चा शोध केला. आज पावसावर आधारित शेती तयार करण्यापूर्वी हिवाळी शेती मधून निर्माण झालेला गहू या पासून तयार केलेली पुरणपोळी, कुरडाई, सांजरी, उन्हाळ्याचे उत्पन्न डांगर (खरबूज), आंब्याच्या झाडाची पाने, यांचा साज चढवून  माठ हे महापृथ्वी चे प्रतिक व त्यात टाकले जाणारे पाणी आकाशाचे प्रतिक यांचे पूजन केले जाते.आणि आई महापृथ्वी जे स्त्री चे प्रतिक आहे व आकाश हे पुरुषाचे प्रतीक आहे. ज्या प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून नवीन पिढी जन्मास येते त्या नुसार येणाऱ्या पावसाळ्यात स्त्री रुपी महापृथ्वी व पुरुष रुपी आकाश यांचे मिलन होऊन पिक रुपी बालक तयार होतात. हा नवीन निर्माण होणारे बालक याच्या आगमनाचा आनंद उत्सव आहे.

🎯 आता आखाजी या शब्दाकडे वळूया
आखाजी हा दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द आहे, आख-आजी
आख म्हणजे आखणी करने किंवा अंदाज घेणे. येणाऱ्या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेणे, त्या नुसार या पावसात कोणते पिक चांगले येऊ शकते याची आखणी (रचना) (प्लानिंग) करणे.

आजी म्हणजे कृषीमायेचे जे ज्ञान पूजन करणाऱ्या स्त्री च्या आजी (पूर्वज) यांनी निर्माण केले आहे. ज्या कृषी ज्ञानाच्या बळावर आपण शेती पिकवून आपली उपजीविका चालवत आहोत, जगत आहोत त्यांची आठवण करने.

🎯 या सणाची विशेषतः आहे हा सणाची पूर्वतयारी, पुजन स्त्रीया करता या सणात विप्र तर नाहीच घरातील पुरुष ही नाही या सणाचा केंद्रबिंदु केवळ स्त्रीया आहेत. या सणाला आमरसाचे जेवण असते हा सण साजरा होई पर्यंत पुजन करणारी घरातील स्त्री आंबा खात नही

🎯 “आखाजी” चे ब्राम्हणीकरण म्हणजे “अक्षय तृतीया”
जसे, शक, हुन, कुशाण, डच, फ़्रेंच, ब्रिटिश, मोगल हे उपरे आहेत त्याच प्रमाणे यांच्या ही अगोदर आलेले विप्र उपरे च आहेत.
वैदिक व्यवस्था पुरुषसत्ताक आहे. तर दुसरीकडे भारतीय समाज मातृपुजक आहेत. म्हणुन भारतात मातृ दैवत आहेत, आणि कुलस्वामिनी ही मातृ दैवत आहेत.मातृ दैवता ला जर ब्राम्हणी पुरुषसत्ताक व्यवस्था विरोध करेल तर मुलनिवासी बहुजन समाज मातृपुजक आहे, आणि जर विरोध केला समाज आपल्या विरोधात जाईल.

म्हणून वैदिक पुरुषसत्ताक छावणी ने याला विरोध ही केला नाही समर्थन ही केले नाही तर “आखाजी” ला पर्याय म्हणून “अक्षय तृतीया” हा पुरुषसत्ताक व्यवस्था चा सण दिला आणि मातृसत्ताक व्यवस्थेचा उत्सव “आखाजी” ला काऊंटर करून या सणाचे ब्राम्हणीकरण करणे सुरू करून आईची हत्या करणारा परशुराम बहुजन समाजावर थोपने सुरू आहे.

🎯 कृषी उत्सव आखाजी सद्यस्थितीत अक्षय तृतीया या ब्राम्हणी बंदी गृहात समाप्त करण्याचा प्रयत्न ब्राम्हणी छावणी करीत आहे. बहुजन समाजाने या पासून वेळीच सावध होऊन महान कृषी मातृउत्सव आखाजी चे जतन-संवर्धन केले पाहिजे.

तरच शिवसंस्कृतीचे जतन होऊन भारत देश  प्रगतिपथावर अग्रेसर  होईल

आखाजी की अक्षय तृतीया

हर हर महादेव